माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या (CWC) सदस्यपदी त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड जाहीर केली.


लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळताना महाविकास आघाडीला ३१ जागांवर मोठे यश मिळवून दिले. शांत, संयमी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून काँग्रेस पक्षामध्ये आमदार बाळासाहेब थोरात लोकप्रिय असून विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे.