उमरगा : सचिन बिद्री:(दि 17)
भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एसी आणि रेफ्रिजरेशन लॅब आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सौजन्याने सुरू करण्यात आली. या लॅब चे उद्घाटन भारत संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे, सचिव पद्मकराराव हराळकर, सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे, संचालक सुनील माने, अशोक पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.


एसी आणि रेफ्रिजरेशन अभियांत्रिकी सेवांमध्ये बेसिक डिप्लोमा आणि ॲडवांन्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि रोजगारभिमुख तांत्रिक शिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वयरोजगार करता येतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी केले आहे. यावेळी माजी प्राचार्य डॉ एन डी शिंदे, डॉ डी एस बिराजदार , उपप्राचार्य डॉ विलास. इंगळे, डॉ पी ए पिटले आयसीआयसीआय फाउंडेशन चे समन्वयक निलेश राऊत आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कोर्स मुळे विद्यार्थ्याना AC सेवा तंत्रज्ञ मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये रेफ्रिजरेटर्स आणि एअर कंडिशनर्सची असेंब्ली आणि चाचणी, सेंट्रलाइज्ड एसी प्लांटची स्थापना आणि देखभाल, कोल्ड स्टोरेज आणि इतर कंपन्यांमध्ये रेफ्रिजरेटर्स,एअर कंडिशनर, वॉटर कूलर इत्यादींची दुरुस्ती आणि प्रतिबंधात्मक देखभाल.
रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, वॉटर कुलरची विक्री,उत्पादक कंपन्यांमध्ये विद्युत देखभाल आदी करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तरी विद्यार्थ्यानी आणि बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ अग्याव असेही आवाहन प्राचार्य डॉ अस्वले यांनी केले आहे .