(सचिन बिद्री)
उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत मौजे.सावळसुर ता.उमरगा येथील महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लक्ष रूपये निधी मंजुर केला आहे.या कामाचे भूमिपूजन दि.16 रोजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात मौजे.सावळसुर येथील ग्रामस्थांनी मागासवर्गीय बांधवांसाठी स्मशानभूमी मंजूर करणे, जूना गावठाण रोहित्र स्थलांतर करणे आदी मागण्यां मंजुर करणे बाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे विनंती केली व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सावळसुर ते बोरी मातोळा रस्ता सुधारणा करणे 08 कोटी 87 लक्ष रू., 95/5 योजनेतून गावांतर्गत रस्ता करणे 20 लक्ष रू. व महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लक्ष असे एकुण 9 कोटी 17 लक्ष रुपये निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचें आभार व्यक्त करत त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, उप तालुकाप्रमुख व्यंकट पाटील, शेखर पाटील, बालाजी पवार, सरपंच प्रेमनाथ कांबळे, उपसरपंच बाळू माशाळ, नितीन पाटील, हरी भोसले, घनश्याम चिंचोळे, इंद्रजीत पाटील, प्रताप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चेअरमन विनायक बिराजदार, सादेवा बिराजदार, बाबुराव सूर्यवंशी, भालचंद्र बिराजदार, महादेव बिराजदार, दिनकर बाबळसुरे, चंदू मुळे, आकाश पाटील, संजय पवार, आकाश पवार आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
