अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित राजस उद्योग समूहाचे संचालक श्री. राजू आर. घुले यांना बर्लिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, यू एस ए कडून मानद डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. याबद्दल त्यांचा नवी दिल्ली येथे विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे. नवी दिल्ली येथे दिनांक २७ जुलै २०२५ रोजी झालेला स्टेट युनिव्हर्सिटी, यू एस ए तर्फे आयोजित भव्य समारंभात राजस उद्योग समूहाचे संचालक श्री. राजू आर. घुले यांना सुवर्णपदकासह मानद डॉक्टरेट (पीएच.डी.) या मानद पदवीने गौरविण्यात आले.या मानद पदवीद्वारे श्री. घुले यांचे बिझनेस मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक अ‍ॅडव्हायजरी आणि क्वालिटी एक्सलन्स या क्षेत्रातील योगदान जागतिक स्तरावर मान्य करण्यात आले. हा सन्मान इंडिया हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली येथे संपन्न कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:
माननीय प्रा. डॉ. दिनेश शर्मा, राज्यसभा सदस्य व माजी उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

कार्यक्रम अध्यक्ष:
• माननीय श्री. जेसन हॉल, उच्चायुक्त, जमैका दूतावास, भारत
• माननीय श्री. गेशन दिसानायके, मंत्री-सल्लागार, श्रीलंका उच्चायोग, नवी दिल्ली

उपस्थित मान्यवर:
• श्री. राजीव शर्मा, IAS (निवृत्त)
• श्री. सी. बी. तिवारी, गृह मंत्रालय, भारत सरकार
• अति. पो. आयुक्त श्री. प्रमोद सोनकर (म.प्र.)
• सौ. अलका सोनकर, अधीक्षक, इंदूर सेंट्रल जेल
• डॉ. पी. के. राजपूत, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅडिला फार्मा
• श्रीमती. एलेना बर्मन, अध्यक्ष, IARC
• डॉ. विक गॅफनी, कायदा शास्त्रज्ञ, ऑस्ट्रेलिया
• डॉ. पुनीत कुमार द्विवेदी आणि डॉ. नेहा शर्मा, Indore/Oxford International College उपस्थित होते

या सन्मानामुळे श्री. राजू घुले यांचे कार्य केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही गौरवले गेले असून, त्यांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.