औरंगाबाद : सिडको प्रशासनाकडून तिसगाव चौफुली ते वडगाव कोल्हाटी या मुख्य रस्त्याच्या काम दुरुस्तीचे काम सुरू आहे या रस्त्यावर वडगाव कोल्हाटी येथील मुख्य चौकात धोकादायक ट्रांसफार्मर (डीपी) असून यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. तसेच भविष्यात मोठा अपघात घडून दुदैवी घटना घडू शकते. त्यामुळे या डीपी चे स्थलांतर करावे, अशी मागणी मा. ग्रा. प. सदस्य दैवशाला कुठारे व सिडको बचाव कृती समितीचे अध्यक्ष उपसरपंच नागेश कुठारे यांनी लेखी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली.


सिडको प्रशासनाकडून तिसगाव चौफुली ते वडगाव कोल्हाटी या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्रा रस्त्यावरील गट नंबर ९८ मध्ये मुख्य रस्त्यावर धोकादायक खांब तसेच वडगाव को. येथील मुख्य चौकात धोकादायक ट्रांसफार्मर रस्त्याच्या मधोमध आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, रस्त्यावरील हे धोकादायक ट्रांसफार्मर तसेच विद्युत खांबाचे त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र सदर रस्त्याचे काम चालू असल्याने, प्रशासनाने अगोदर धोकादायक ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत खांब स्थलांतरीत करावा. त्यानंतरच रस्त्याचे काम करावे. अन्यथा प्रशासन विरुद्ध लोकशाही मागाने आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे माजी ग्रा प सदस्य दैवशाला कुठारे, सिडको बचाव कृती समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच नागेश कुठारे, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब बुट्टे, गणेश बिरंगळझ प्रवीण हांडे, नरेंद्र यादव, शितल गंगवाल आदींनी दिला.

प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *