फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम येडशी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महात्मा फुले नगर येथील बुद्धविहारात एकत्र येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

6 डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिनी देशातून चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी विविध ठिकाणावरून येत असतात, मात्र देशात नवीन कोरोना विषाणूचे संक्रमन होत असल्याने शासनाने काही निर्बंध लादले असता, महामानवाला घरूनच अभिवादन केले जाते. यांचउद्देशाने ग्राम येडशी येथील बुद्धविहारात एकत्र अभिवादन केले. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्तितीत कृषी सहाय्यक ठोंबरे, प्रकाश बनसोड, बबनराव चक्रनारायण,जनार्धन बारड,प्रकाश बन्सीराम पडघान, खंडारे, वसुदेव कुरकुटे, ज्ञानेश्वर जाधव, शेषराव पवार, सचिन चक्रनारायण, भीमराव चक्रनारायण, करण शेजव, संदेश खंडारे, अंकुश कांबळे, आकाश वानखडे, नितीन कांबळे, संदेश वानखडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *