अकोला जिल्ह्यात १३७० मे. टन खत प्राप्त;जिल्हाधिकारी यांच्याकडून रेक पॉईंटची पाहणी
फुलचंद भगत
वाशिम:-अकोला व वाशीम जिल्ह्यासाठी खताची रेक आज अकोला येथील रेक पॉईंटला पोहोचली.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी या पॉईंटला भेट देऊन पाहणी केली. खतांचे योग्य वितरण व्हावे कुठेही लिंकिंग आदी गैरव्यवहार घडता कामा नये, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिला.अकोला रेक पॉइंटवर चंबळ फर्टिलायझर लि. या कंपनीची कांडला, गुजरात बंदरातून १७ मे २०२६ रोजी निघालेली आयातीत खताची रेक पोहोचली.सदर रेक मध्ये आयातीत संयुक्त खत १०:२६:२६- ९८६ मे. टन व एमओपी (पोटाश) – ३८४ मे टन प्राप्त झाले आहे.
ह्या रेक मधून प्राप्त झालेले खत अकोला व वाशिम जिल्ह्याकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच खत सनियंत्रण आयएफएमएस प्रणालीमध्ये डेटा त्वरित अपलोड करणेबाबत कंपनी प्रतिनिधी ह्याना निर्देश दिले. या खतासोबत इतर खते लिंकिंग न करणेबाबत सक्त सूचना देण्यात आल्या.
