
लातुर : अहमदपूर येथे दारुच्या व्यसनातुन मुक्त झालेल्या नागरिकांचा सह पत्नीक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अॅड टी एन काबंळे (माजी सभापती जि. प. लातुर तथा अध्यक्ष कोअर कमिटी मा. लो. प. महा राज्य) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. जेष्ठ पत्रकार दिनकर मदेवार हे होते.

साठे नगर येथे दारूच्या व्यसनामुळे तीन कुटुबंकर्ते गेले त्यामुळे साठे नगरच्या युवकानी गेल्या दोन वर्षांपासून संकल्प केला की, दारूच्या व्यसनाधीन नागरीकाना व्यसनमुक्त करायचे आज त्यांना कांही प्रमाणात यश येत असल्याचे दिसून आले. व आज व्यसनाधीन 18 नागरिकांनी कायमची दारू सोडली व ते आज सुखी संसार करत आहेत म्हणून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला .

या प्रसंगी बोलताना अॅड टी एन काबंळे म्हणाले की, ज्या दारूने आपल्या मुलांना शिक्षण पूर्ण करु दिले नाही ,ज्या दारूने आपल्या घरात आठरा विश्व दारिद्रय आणले, तिच्या पासुन दूर राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गाने आपल्या मुलांना शिक्षण देऊन मोठ्या हुधावर नेण्याचा प्रयत्न करावा व सुखी संसार करावा असा सल्ला दिला त्यांनी साठे नगरच्या या युवकाचे तोंड भरून स्तुती केली व त्यांचे मनापासून अभिनंदन केले. यापुढे ही या कामात खंड पडू देऊ नये असा ही सल्ला युवकांना दिला

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनिल डावरे, दस्तगीर शेख, अशिष तोगरे, महेंद्र ससाणे यांनी ही आपले विचार व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहिदास डावरे, बालाजी शिंदे, मनोज कांबळे, माधव समुखराव, राजेश समुखराव, महेश कसबे, संजय डावरे, राहुल समुखराव, बालाजी समुखराव, शंकर कांबळे, मुकुंद वाघमारे, प्रमोद गायकवाड, बालाजी बनसोडे, ईत्यानी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद वाघमारे यांनी केले तर आभार जगदिश वाघमारे यांनी केले