औरंगाबाद : सावत्र आईने बारावर्षीय मुलाच्या तोंडावर बुक्का मारून दात पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर मुलाच्या २१ वर्षीय भावाने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठत सावत्र आई व वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.

बेगमपुरा ठाण्यात तक्रार दिलेल्या २१ वर्षीय मुलाच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले होते. २०१६ मध्ये त्याच्या वडिलांनी नुसरत नामक महिलेसोबत दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीची दोन मुले त्यांच्यासोबत राहत होती. मात्र, क्षुल्लक कारणावरून वडील व सावत्र आई सतत वाद घालून मुलांना शिवीगाळ करत असल्यामुळे २१ वर्षीय भाऊ सहा महिन्यांपूर्वी आरेफ कॉलनीतील आजोबाकडे राहण्यासाठी गेला होता.
१२ वर्षाचा छोटा भाऊ वडील व सावत्र आईसोबत राहत होता. मात्र त्यानंतर आई, वडिलांनी बारा वर्षाच्या मुलाला चटके देणे सुरू केले. मारहाण व शिवीगाळ करत नुसरतने मुलाच्या तोंडावर बुक्का मारून दात पाडले. त्यानंतर भिंतीवर डोके आपटले. यात त्याला चकरा येऊ लागल्या. हे समजल्यावर चिडलेल्या मोठ्या भावाने त्याला तत्काळ आजोबांकडे नेले. त्यानंतर मोठ्या भावाने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास फौजदार चौहान करीत आहेत.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400.