पालघर विधानसभेच्या ग्रामिण भागाच्या विकासासाठी वचनबद्ध असुन येत्या काही महिन्यांमध्ये पालघर व डहाणू तालुक्यातील ग्रमिण भागातील मुख्यरस्ते, गावजोड रस्ते, पाड्यांवरील रस्ते, होण्यासाठी प्रयत्नशिल असुन शासनाच्या विविध योजनांमध्ये कामे सामाविष्ठ केली आहेत. ती सर्व मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, बांधकाम विभाग, मत्य विभाग, आणी जिल्हा नियोजनच्या माध्यमातुन कामे मंजुर करून घेण्यासाठी प्रयत्न असुन नुकताच ग्रामविकास मंत्रालयाकडून साधारण ५.५० कोटी रुपयांची ३६ विकास कामे तसेच लेखाशिर्ष ३०५४ मधुन ५ विकास कामे साधारण १.५० कोटी रुपये ची कामे मंजुर झाली असुन त्यांचे सुद्धा भुमीपुजन व कार्यारंभ लवकरच सुरू होईल. आणी ७२ लक्ष रुपयांची मत्स्य विकास विभागाची किनारपट्टी वरील विकास कामे आणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन डहाणू विभागात १८ कोटी रुपयांची शासनाच्या वार्षीक बजेट मधून कामे मंजुर करण्यास यश मिळाले असुन त्यांचे देखील लवकरच भुमीपुजन करण्यात येईल. केळवे ते धाकटी डहाणू असा किनारपट्टी वरील बंदर विकासाची कामे आणी केळवे, माहिम, शिरगाव, सातपाटी, आलेवाडी, नांदगाव, मुरबे, चिंचणी, अशा पर्यटन स्थळांचा सर्वांगीण विकासासाठी प्रस्ताव सादर केले असल्याचे या वेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनी या प्रसंगी सांगीतले. ते आसनगाव येथिल आमदार निधी च्या विकास कामांचा भुमीपुजन प्रसंगी बोलत होते.
दरम्यान गेली दोन वर्ष कोविड-१९ च्या माहामारी मुळे विकास कामांना खीळ बसली होती. मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातुन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब व राज्यांचे उपमुख्यंमंत्री मा. श्री. अजित दादा पवार आणि नगर विकास मंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली विकास निधी मंजुर करण्यास यश मिळाले असुन त्याचा फायदा पालघर विधानसभेच्या जनतेसाठी करण्याचा माझा मानस आहे. असेही आमदार श्रीनिवास वनगा यांनी या प्रसंगी सांगीतले. दरम्यान डहाणू तालुक्यातील अब्राम येथे समाज मंदिर व कोटीम येथे सभागृहाच्या कामाचे भुमीपुजन या वेळी करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. राजेश भाई शाह, माजी. कृषी सभापती श्री. सुशिल चुरी, जि. प. सदस्य, श्री. जयेंद्र दुबळा, डहाणू पंचायत समिती उप सभापती श्री. पिंटू गहला, पं. स. सदस्य श्रीमती काजल राबड, शिवसेना तालुका उप प्रमुख श्री. बळवंत राऊत व श्री. कमलेश भानुशाली, धाकटी डहाणू सरपंच श्री. सुरेंद्र राबड, चिंचणी सरपंच श्री. धोडी, अब्राम धुमकेत आणी आसनगाव व कोटीम या गावांचे सरपंच, उपयरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधीकारी उपस्थीत होते.
