जिजाऊची छुपी खेळी यशस्वी,
स्थानिक शिवसैनिक,नगरसेवकांत असंतोष,नाराजीचा सूर
पालघर : जव्हार नगरपरिषदेत एकाएकी नगराध्यक्ष पद उप नगराध्यक्षा सौ.पद्मा गणेश रजपूत यांच्या कडे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी सोपविल्याने जव्हार शहरात एकच राजकीय चर्चेला जणू ऊधाण आले आहे.त्यामुळे जव्हारवासियांमध्ये,संभ्रम निर्माण झाल्याने हा कुतूहलाचा विषय ठरतो आहे.

जव्हार नगरपरिषदेवर गेल्या ४ वर्षापासून शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा नगरसेवकांची जव्हार नगरपरिषदेवर सत्ता चालू आहे.त्यात नगराध्यक्ष चंद्रकांत पुरूषोत्तम पटेल हे जनतेच्या,मतदारांच्या आशिवार्दाने नगराध्यक्ष बनले आहेत.त्यांच्या पदभाराला ४ वर्षे झाले आहेत तर सत्तेतील विरोधी बाकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी गटनेते पदी दिपक कांगणे यांनी जव्हार नगरपरिषदेच्या कामकाजावर बारकाईने लक्ष केंद्रित केलेले पाहावयास मिळत आहे.

काही कारणास्तव मागील वर्षी विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल व सत्ताधारी सेनेच्या नगरसेवकांमध्ये,आपसांत नगराध्यक्षांच्या मनमानी कार्यप्रणाली वरुन मतभेद उसळले होते.परंतु अजुनही नगराध्यक्षांच्या विरोधात सेनेच्या नगरसेवकांमध्ये,असंतोष खदखदत आहे.यात शंका नाही. हि असंतोषाची लाट आज हि सेनेच्या नगरसेवकांमध्ये,पाहायला मिळत आहे. हे वादळ आज हि शमलेले नाही असेच म्हणावे लागेल. हे आज पदभार स्विकारल्यानंतर नगराध्यक्ष पद्मा रजपूत यांच्या निवडी दरम्यान पाहायला मिळाले. शिवसेनेचे काही स्थानिक पदाधिकारी, जव्हार नगरपरिषदेचे सेनेचे नगरसेवक यांना नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी विश्वासात न घेता काही दिवस उपनगराध्यक्षा पद्मा गणेश रजपूत यांच्याकडे नगराध्यक्ष पद सोपविण्याचा निर्णय घेतल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.ह्या सर्व प्रकाराला सत्ताधारी सेनेच्या नगरसेवकांचा विरोध होता.यावेळी पद्मा रजपूत यांनी पदभार स्वीकारताना शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी दांड्या का मारल्या होत्या तर
विरोधी गटनेते, राष्ट्रवादी नगरसेवक यांची हजेरी दिसली नाही.जव्हार नगरपरिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे ना?
मग नगराध्यक्ष पदाचा पदभार दुसऱ्यांकडे देतेवेळी त्यांना नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घ्यायला हवे कि,नाही? हा हि विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यामुळे हा विषय राजकीय वर्तुळात कळीचा मुद्दा ठरला आहे.ह्या सर्व प्रकाराचा आमचे Ntv प्रतिनिधींनी जनतेसमोर उलगडा केला आहे
नगराध्यक्ष चद्रकांत पटेल यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी दिनांक २१जानेवारी २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत रजेवर जात असल्याने भासवुन दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार जव्हार नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. पद्मा गणेश रजपूत यांच्याकडे सुपूर्द केला आहे.त्यामुळे जिजाऊची अंतर्गत राजकीय खेळी यशस्वी झाली आहे. हे सर्व घडत असताना शिवसेना नगराध्यक्षांनी पालघर जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना,हायकमांड ला विश्वासात न घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे
नेमके असे का घडले
जव्हार परिषदेकडून खडखड योजनेचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.ते काम झाल्यानंतर जव्हार शहरातील रस्त्याची कामे काढण्यासाठी नगरपरिषदेने निविदा काढल्या होत्या. त्या कामाच्या निविदा जिजाऊं निलेश सांबरेनी अनेक रस्त्यांसाठी निविदा भरल्या होत्या तर काही निविदा जव्हार शहरातील ठेकेदारांनी भरल्या होत्या. निलेश सांबरेनी भरलेल्या निविदा मागे घेण्यासाठी काही सत्तेतील सबंधितांना या व्यतिरिक्त नगराध्यक्ष पद निदान १५ दिवस उपभोगावयाची इच्छा नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांच्या कडे व्यक्त केली होती. ती सुप्त इच्छा आता त्यांनी पूर्ण केली आहे. हि माहिती खास गुप्तचरांकडून कळते आहे. पद्मा रजपूत यांना पदभार सोपविताना जव्हार नगराध्यक्षांनी सेनेचे नगरसेवक,पदाधिकारी यांना विश्वासात घेतले नाही.त्यामुळे काही शिवसेनेच्या पदाधिकारींनी नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठविला आहे.अशा घटना जव्हार शहरात घडत आहेत.
त्यामुळे जव्हार नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांत दुफळी निर्माण झालेली आहे.
नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर सौ. पद्मा रजपूत यांच्या समर्थकात जल्लोष पाहायला मिळतो आहे तर सत्तेतील सेनेच्या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. …
भरत गवारी,जव्हार