पालघर - ठाण्यातील आयलिफ रिट्ज बँक्वेट येथे कोकण भूमी प्रतिष्ठान - समृध्द कोकण प्रदेश संघटना आयोजित ग्लोबल कोकण उद्योग परिषद व कोकण आयडॉल पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कुठलेही डोनेशन न घेता स्वतःच्या उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नातून करत असलेल्या सामाजिक कार्यासाठी , उद्योजक आणि स्पर्धा परीक्षा तसेच अन्य क्षेत्रात सामाजिक कार्यकर्ता म्हणून मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना श्री. प्रविण दरेकर (विरोधी पक्ष नेते, विधान परिषद) यांच्या हस्ते कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सभागृहातील प्रत्येकाने उभे राहून टाळ्यांच्या गजरात श्री. निलेश सांबरे साहेबांचे अभिनंदन केले व कोकण आयडॉल पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केले. यावेळी श्री. निरंजन डावखरे (आमदार - ठाणे), डॉ. अरुण सावंत व अनेक उद्योजक उपस्थित होते.
