महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई ची 62 वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे पार पडली. या सर्व सभेत काही महत्वाचे विषय हाताळण्यात आले. तसेच काही महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आले.महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या उपस्थितीत सभा पार पडली
यामध्ये प्रामुख्याने –
1) 61 व्या अधिमंडळाच्या वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले.
2) ताळेबंद व नफा वाटणी प्रस्ताव देखील सभेत मंजूर करण्यात आला.
3) सन 2019-2020 च्या अंदाजपत्रकानुसार प्रत्यक्ष झालेला खर्च व उत्पन्न याला मंजुरी देण्यात आली.
4) सन 2019-2020 लेखापरिक्षण अहवाल मंजुरी.
5) सन 2018 – 2019 दोष दुरुस्ती अहवाल मंजुरी.
6) महत्वाचा निर्णय: 2020-2021 च्या पणन महासंघाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.
या प्रसंगी सदस्य श्री.सूर्यवंशी, व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, सरव्यवस्थापक प्रसाद ओक, शिवाजी ठोंबरे, अतुल नेरकर, जळगावचे राहुल पाटील, एन.बी.यादव, एस.एस. कदम, देविदास भोकरे, ए.आर.महाडिक, आर.डी.दांड, परीमल सोळंके, जि. प. सदस्य माधवराव जाधव, विजय गोसावी, महेंद्र ढकाणे, यांच्यासह पणन महासंघाचे सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
लातूर जिल्हा ब्युरो चीफ अफजल मोमीन एन टी व्हि न्युज मराठी लातूर 9890047700