वाशिम :- मंगरुळपीर येथिल चितलांगे इंण्डेण व चितलांगे पेट्रोलियमचे संचालक व भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य पुरुषोत्तमजी लालचंद चितलांगे यांची पुन्हा आगामी काळासाठी भाजपा प्रदेश कार्यकरीणी निमंत्रीत सदस्य या पदावर भाजपाचे प्रदेशाध्यक्षा श्री चंद्रशेखरजी बावणकुळे यांनी नियुक्ती केली.पुरुषोत्तम चितलांगे हे 1994 पासून पक्षाचे कार्यकर्त्ये आहेत.भाजपा शहर अध्यक्ष ते भाजपा जिल्हा सरचिटनिस ते नगरसेवक ते विविध जबादारीचे संयोजक म्हणुन त्यांनी यशस्वी कार्य केले पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली पक्षाच्या माध्यमातुन जनसेवेचे कामा सोबत वर्षभर विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे ते आयोजन निस्वार्थपणे करीत असतात.त्यांनी आपल्या नियुक्तीची श्रेय पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते तथा जिल्हयातील सर्व वरिष्ठ नेते, जिल्हाअध्यक्ष,लोकप्रतिनिधी,संघटणमंत्री,वरिष्ठ पदाधिकारी यांना देतात.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206