वाशिम :- दि. १९/०५/२०२३ रोजी गुप्त माहीतीचे आधारे पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथील अधिकारी
सपोनि / शिवचरण डोंगरे पोहवा / ८६७ अमोल मुंदे, पोकॉ/ २९१ जितेंद्र ठाकरे, पोकॉ/१३७४ मोहम्मद परसुवाले असे पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहीतीचे आधारे शहापुर मंगरूळपीर येथुन आरोपी नामे राहुल ज्ञानेश्वर काळे रा. सोनखास मंगरूळपीर याचे ताब्यातील शासनाने प्रतीबंधीत विक्री करीता प्रतीबंधीत केलेला वेगवेगळया
कंपणीचा गुटखा किंमत ४५३२८ / रू चा मुददेमाल जप्त केला आहे. वरून पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे
कलम १८८, २७२, २७३,३२८ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही ही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पांडे साहेब, पोलीस निरीक्षक श्री हुड
साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / शिवचरण डोंगरे यांनी केली असुन गुन्हयास तपास सपोनि / शिवचरण डोंगरे
पोलीस स्टेशन मंगयळपीर हे करीत आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206