शहरातील मुख्य चौकातुन काढली शोभायाञा
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर येथे महेश नवमीनिमित्य शहरातील मुख्य चौकातुन शोभायाञा काढुन तसेच विविध धार्मीक तसेच सामाजीक ऊपक्रम राबवुन समस्त माहेश्वरी बांधवांनी ऊत्सव मोठ्या ऊत्साहात साजरा केला.यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.
माहेश्वरी समाजात महेश नवमीला खूप महत्त्व आहे. महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मंडळ मंगरूळपीर विभागातर्फे धार्मिक व सामाजीक ऊपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सजवलेल्या रथात भगवान महेश व पार्वती माता यांची वेशभूषा केलेल्या मुलांची ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.शहरातील मुख्य चौकातुन मिरवणुक काढुन शेवटी महाआरतीने सांगता करण्यात आली.पंचांगानुसार, महेश नवमीचा ऊत्सव दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. महेश नवमी ही भगवान शिवाला समर्पित आहे. या तिथीला भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने माहेश्वरी समाजाचा जन्म झाला अशी धार्मिक श्रद्धा आहे. अशा परिस्थितीत माहेश्वरी समाजासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महेश हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात अशी धार्मीक धारणा असल्याने माहेश्वरी समाजातील लोकं हा दिवस थाटामाटात साजरा करतात.मंगरुळपीर येथेही दरवर्षीप्रमाने सर्व समाजबांधवांनी महेश नवमीनिमित्य शहरातुन शोभायाञा काढत आनंद व्दिगुनीत केला.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206