जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणने तयारीही केली आहे. यायोजनेत नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, पारेगाव गावांचा समावेश केला आहे.शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार
निवड झालेल्या गावात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत घरगुती ग्राहकांना ३ किलोवॅटपर्यंत ७८ हजार रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी
शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार आहे. या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्यगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरण आवाहन करणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निवासी घरगुती ग्राहकांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान दोन किलोवॅट पर्यंत मिळते. तीन किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी रुपये १८ हजार अनुदान मिळते. तीन किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान रुपये ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे.