जामखेड प्रतिनिधी –
दि 30 ऑगस्ट
आमदार प्रा. राम शिंदे यांनी कोठारी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कोठारी प्रतिष्ठाणच्या वतीने आमदार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, नगरसेवक अमीत चिंतामणी, पवनराजे राळेभात ,सोमनाथ राळेभात, विजय कोठारी, अशोक चोरडीया, डॉ भरत दारकुंडे,प्रवीण छाजेड, प्रफुल्ल सोळंकी, विष्णू गंभीरे, विनायक राऊत,काशिनाथ ओमासे, डाॅ गणेश जगताप, गणेश गोरे, संदीप भंडारी, दीपक भोरे, गोरख राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार राम शिंदे म्हणाले,सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य आगळेवेगळेअसून, अपघातग्रस्तांना जीवदान देण्याचे खूप मोठे काम त्यांच्या हातून निरंतर होत आहे. असे सांगत, सर्व महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
नंदु परदेशी जिल्हा प्रतिनिधी
अहमद नगर
मो नं 9765886124