WASHIM | दि.०८.०७.२०२५ रोजी रात्री ०९.०० वा. दरम्यान चालक ज्ञानेश्वर माधवराव मोरे रा. अहिरवाडी हा अमरावती येथून अशोक लेलॅन्ड १८१५ वाहन क्र. एम.एच.१४ एल.एक्स. २२८० मधे पशुखाद्य भरुन वाशिम मार्गे जवळाबाजार जि. हिंगोली असे जात होता. अमरावतीचे बाहेर आल्यानंतर चालकाने विश्राती घेवुन निघाला असता रात्री अंदाजे ०३.०० वाजताचे दरम्याण म्हसला फाटयाजवळ गतीरोधक असल्याने वाहनाचा वेग कमी केला. त्याचवेळी मागुन एक पांढ-या रंगाची टाटा कंपणीची एम.एच.२६ पासिंग असलेली कार अज्ञात इसमांनी अशोक लेलॅन्ड वाहनाचे पुढे आडवी लावली. कारचा चालक कार मध्ये थांबला व ०४ ईसम उतरले, त्यांनी अशोक लेलॅन्डचे चालकाला खाली ओढुन चाकुचा धाक दाखवुन त्याला तेथेच सोडुन, अशोक लेलॅन्ड १८१५ वाहन पशुखाद्यासह अंदाजे एकुण २५ लक्ष ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन घेवुन गेल्याने आरोपींविरुध्द पो.स्टे.धनज अप.क्र. १६०/२०२५ क. ३१०(१) (दरोडा) भा.न्या. संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला.
पोलीस स्टेशन धनजचे ठाणेदार भारत लसंते यांनी तात्काळ तपास पथक तयार केल. चालकास माहिती विचारली असता चालकाने सांगीतलेली घटना व आरोपींचे वर्णन यावरुन तपासाची चक्रे फिरवुन संशयीत आरोपी पांडुरंग तातेराव मेथे याची गोपणीय माहिती घेतली. मिळालेल्या माहितीवरुन तांत्रीक पध्दतीने तपास केला. तसेच वाहन घेवुन गेलेल्या मार्गावरील मानोरा, दिग्रस, पुसद ठोणदारांना माहिती देवुन ठाणेदार धनज व स्टाफने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तत्परतेने दखल घेवुन शिघ्रगतीने तपासचक्रे फिरवुन घटनास्थळावरुन सुमारे १०० कि.मी. दुरवर चोरीस गेलेला अशोक लेलॅन्ड १८१५ वाहन पशुखाद्यासह ताब्यात घेवुन, आरोपींनी गुन्हयात वापरलेल्या कारसह सर्व आरोपींना अटक केली आहे.
सदर कारवाई मा. श्री अनुज तारे, पोलीस अधिक्षक वाशिम, मा. श्रीमती लता फड, अपर पोलीस अधिक्षक, मा. श्री. प्रदीप पाडवी उप विभागीय पोलीस अधीकारी कारंजा, यांचे मार्गदर्शनात सपोनि. भारत लसंते, पोउपनि शिंदे, अंमलदार गजानन वर, आशिष खांडरे, राजेश अंबुरे, अफसर रायलीवाले, मनोज डहाके, किरण गुहे, प्रफुल गावंडे सर्व पो.स्टे.धनज व पो.स्टे पुसद येथील सपोनि. केदारे, शेंबडे, अंमलदार आकाश, भगत, मनोज, दातीर यांनी कठोर परिश्रम घेवुन गोपनिय माहिती मिळवून केलेल्या तांत्रीक तपासामुळेच गुन्हा उघडकीस येवुन आरोपींना अटक झाली आहे. करीता तपास पथकाला रिवार्ड देण्यात आला आहे.

प्रतिनीधी फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *