उमरखेड( तालुका प्रतिनिधी ):- उमरखेड तालुक्यात स्थापित असलेली सत्य निर्मिती महिला मंडळ यांच्या वतीने नववी व दहावी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक संच तसेच शालेय लेखी संच वाटण्यात आले मागील पंधरा वर्षापासून सुरू असलेली हे अभियान कायम ठेवण्यात आले सत्य निर्मिती महिला मंडळ उमरखेड याच्यावतीने बेटी पढाव भविष्य बचाव असे अभियान सुरू करण्यात आले आणि या अभियानांतर्गत मुलींना व महिलांना शैक्षणिक दृष्ट्या सहायता मिळावी याकरिता सत्यनिर्मिती महिला मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष शबाना खान यांनी या अभियानाची सुरुवात केली या अभियानाला शासनातर्फे कोणतेही अनुदान येत नसून हे अभियान सत्यनिर्मिती महिला मंडळ आपल्या वतीने व समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने चालवीत आहे बेटी पढाव भविष्य बचाव हे अभियान सन 2010 मध्ये सुरू करण्यात आले आणि या अभियानामध्ये ज्या मुलींना शिक्षणाची ओढ आहे परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ते पुढील शिक्षण घेत नाही अशा मुलींना सत्यनिर्मिती महिला मंडळ आर्थिक सहायता करून त्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे साहित्य प्रदान करते शासनाने सर्व शिक्षण अभियानांतर्गत फक्त आठवीपर्यंतच विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक देण्यात येते याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कोणतेही सुविधा देण्यात येत नाही आणि अशा मुळे जास्तीत जास्त मुली हे आठवी नंतर शिक्षण घेत नव्हते त्याचे महत्त्वपूर्ण कारण हे असते की त्यांच्याकडे पुस्तक घ्यायला किंवा लेखी संच घ्यायला तसेच प्रॅक्टिकल बुक्स घ्यायला पैसे नसायचे पण सत्यनिर्मिती महिला मंडळ अशा गर्जुवंत मुलींना शालेय पुस्तक संच लेखी पुस्तक संच तसेच प्रॅक्टिकल बुक्स आणि वेळोवेळी लागणारी शालेय साहित्य विनाशुल्क प्रदान केले आणि आज ही करते ज्यामुळे आज उमरखेड तालुका मध्ये मुलींचे शिक्षण वाढले सत्यनिर्मिती महिला मंडळ हे जिल्ह्यातील एकमेव महिला मंडळ अशी आहे की जे सतत 15 वर्षांपासून मुलींना शिक्षणासाठी लागणारे साहित्य देऊन त्यांना शैक्षणिक दृष्ट्या प्रबळ बनवत आहे स्वातंत्र्य दिना निमित्त 15 अगस्त ते 30 ऑगस्ट स्वातंत्र सप्ताहामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सत्य निर्मिती महिला मंडळ उमरखेड यांनी उमरखेड शहरातील शाळांना भेट देऊन तेथील गर्जवंत विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप केले आणि सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या काही अडचणी असल्यास नी संकोच सांगण्यास त्यांना सांगितले आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपापली समस्या त्यांच्यासमोर मांडली तसेच अध्यक्ष सौभाग्यवती शबाना खान यांनी मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले आणि कोणत्याही क्षणी महिला मंडळ ची आवश्यकता असल्यास ते सदैव विद्यार्थींसाठी तयार आहे आणि होईल तेवढे प्रयत्न करून त्यांची सहायता करण्यात येईल याचे वचन दिले यावेळी सत्यनिर्मिती महिला मंडळ टीमचे सर्व पदाधिकारी सौ डॉक्टर वंदना मसूरळकर मॅडम, सौ रेहाना सिद्धी सौ तब्बसुंम सौआनंदी पुरी कु शैला धाडे सौ सविता निलेश पवार ,रेहाना दादू सौ सविता भागवत सौ निलोफर मॅडम सौ मुबीना शेख फरजना शेख कू मीनाक्षी शिंदे तसेच सर्व सदस्य आणि उमरखेड शहरातील नगरपरिषद आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग हजर होते यावेळी सर्वांना सत्यनिर्मिती महिला मंडळ तर्फे स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.