छत्रपती संभाजीनगर

डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमांतुन धार्मिक व जातीय भावना दुखावुन दोन समाजात तेढ निर्माण होतील असे स्टेटस, व्हिडीओ क्लिप्स,आक्षेपार्ह मजकुर, एसएमएस, तयार करून प्रसारित करण्यासारखे कृत्य करून सामाजिक सौहार्द बिघडवणा-या कोणत्याही व्यक्तीची हयगय न करता त्यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत सामाजीक शांतता खराब करून अशांतता होईल असे वातावरण निर्माण करणा-या व्यक्तींविरुध्द ची.एन.एस. २०२३ चे कलम १९६, २९९, कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशिर कारवाई ला सामोर जावे लागणार आहे.पोलीस अधीक्षक यांचे सुचनानुसार जिल्हयातील सामाजिक सौहार्द बिघडविण्या-या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नसुन त्यांचे विरुध्द सातत्याने थेट व धडक गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, नागरिकांनी सोशल मिडीयाचे
माध्यमांतुन पसरविण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची सर्व प्रथम खात्री करणे अत्यावश्यक आहे. जुने विवादीत बाबींचा काहि असामाजिक तत्व हे फायदा घेवून सोशल मिडीयाचे माध्यमांतुन निराधार व खोटी अफवा पसरवून जाती- जातीत तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.समाजकंटकाद्वारे विविध मार्गाचा अवलंब करण्यात येवुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे दृष्टीने
सामाजिक व भावनिक गोष्टीला साद घालुन निष्पाप तरूणाईच्या डोक्यात इतराबाबत द्वेष निर्माण करण्यात येतो.
पोलीस, सर्व परिस्थीतीला हाताळण्यास सक्षम असुन सायबर पोलीस टिम तंत्रज्ञान व विशेष टुलच्या साहय्याने सर्व प्रकारच्या सोशल मिडीया साईटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलीसांची सोशल मिडीया पेट्रालिंग नियमत सुरु असते.
यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवावे जेणे करून त्यांच्याकडुन प्रक्षोभक किंवा समाजमन दुखावले जातील अशा आशयाचे मत कोणत्याही सोशल माध्यमांतुन दिले जाणार नाही यांची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण गुन्हे दाखल झालेल्या व्यक्ती मध्ये बहुतांश प्रमाणात १९ ते ३० वयोगटातील तरुण मुलांचा समावेश असतो. त्यामुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांचे कृतीचा नंतर पश्चाताप होतो परंतु तो पर्यंत वेळ निघुन गेलली असते.
त्यामुळे सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवु नये अगर फॉरवर्ड करू नये, तसेच कोणत्याही पोस्ट ला प्रतिक्रिया देतांना संयम बाळगावा घायी घायीने प्रतिउत्तर देतांना अपशब्दांचा वापर झाल्यास हा सुध्दा अपराध आहे, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने बुध्दिपुरस्सर व दृष्ट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी अगर चिन्हाद्वारे तसेच दृश्य देखाव्याद्धारे (Visible Representation) त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करणा-या व्यक्तीला नमुद कलमा नुसार ३ वर्षा पर्यंत कारावास व दंड शिक्षा होवु शकते.

छत्रपती संभाजीनगर रिपोर्टर जब्बार तडवी