गाव तेेथे शाखा स्थापन करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार


वाशिम : रिसोड तालुक्यातील ग्राम वाकद व मोप येथे पक्षाध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशावरुन व कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवंजाळ, प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनात ८ फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा स्थापना व कार्यकारणीचे गठन करण्यात आले.
यानिमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुण जटाळे तर प्रमुख पाहूणे म्हणून दत्ता महाराज पाकधने, उपजिल्हाप्रमुख दिलीप भेंडेकर, संजय गोटे, अमोल घोडे, विनोद देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते शाखा नामफलकाचे फित कापून उद्घाटन केले.

तालुक्यात गाव तेथे शाखा स्थापन करुन ना. बच्चुभाऊ कडू यांचे विचार घराघरात पोहचवु असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी वाकद व मोप शाखा कार्यकारणीचे गठन करण्यात आले. मोप शाखा अध्यक्षपदी शिवशंकर तिरके, शाखा उपाध्यक्ष गणेश जाधव, शाखा सचिवपदी शे.आयुब तर सदस्यपदी अभिषेक मापारी, अमोल मापरी, सागर देशमुख, कैलास तिरके, रंजीत देशमुख, आकाश लाटे तर वाकदवाडी शाखा अध्यक्ष सदाशिव मुंढे, उपाध्यक्ष गणेश घुगे, सचिव गजानन मुंढे, सदस्य शुभम मुंढे, अक्षय घुगे, आकाश डोंगरे, सुनील डोंगरे, प्रल्हाद आव्हाड, भगवान दराडे, पिंपरखेड शाखा अध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष पंजाब गीते, शाखा सचिव दीपक जाधव, सदस्य अनिल मुंढे, दिलीप जाधव, प्रमोद जाधव, अरुण सानप, शरद जाधव, राजु गिते. संतोष आघाव, सचिन गवई, निरज गवई, पवन जायभाये अशी शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाला शाखेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273207

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *