गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अहेरी येथे आज दिनांक 22.04.2022 रोज शुक्रवारला माझ्या सासु श्रीमती वराबाई रामय्याजी गुडेल्लीवार यांचा शताब्दी जन्मोत्सव सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. ज्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला ह्या सोहळ्याचे प्रमुख सूत्रधार प्रकाश गुडेल्लीवार यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो की सकाळी मंगलस्नान मृत्युंजय जप, होमहवन, पादपुजन कार्यक्रम करण्यात आले. यावेळी त्यांचे सुपुत्र, सूना, मुली, जावई, नातवंड,आप्तेष्ट,मित्रपरिवार, उपस्थित होते.


सायंकाळी 06:00 वाजता इंडीयन पॅलेस हॉल ,अहेरी येथे मुख्य प्रवेश द्वाराजवळ मंत्रोच्चाराने त्यांची आरती ओवाळून सभामंचापर्यंत गुलाबांच्या पाकळ्यांच्या वर्षावात त्यांना नेण्यात आले. तद्नंतर सभामंचावर स्थानापन्न करून तुलाभार करून परत पादपुजन करून परिवारातील सर्व मंडळींनी पुष्पहार घालून ,एकशे एक दिव्यांची आरती केली गेली. मान्यवरांचे मनोगत ,नातवंडांचे व्हिडिओ दाखवून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.त्यानंतर उपस्थितांनी वात्सल्यामुर्ती सत्कारमूर्ती सासुंची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. तद्नंतर प्रितिभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात 1000 ते 1200 आप्तेष्ट ,हितचिंतकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी 06:00 ते 11:00 पर्यंत चाललेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात चैतन्यता राहावी म्हणून आईच्या जीवनावरील गाणी,इतर सोहळा पूरक गाणी सादर करून वातावरण प्रसन्न ठेवण्यात आले. मी माझ्या जीवनात अनेक कार्यक्रम पाहिले,ऐकले,वाचले, व काही मोठे कार्यक्रम हाताळले सुध्दा आहे. परंतु या अविस्मरणीय शताब्दी आनंदोत्सव सोहळ्याचा आस्वाद घेताना जो आनंद प्राप्त झाला तो अविस्मरणीय आणि शब्दांसाठी आभाळ अपुर पळेल असाच राहणार आहे. कारण शताब्दी महोत्सव सारखा भव्य कार्यक्रम यापूर्वी कधी बघितला नाही आणि पुढे बघणार पण नाही म्हणून न भूतो न भविष्यती हा अविस्मरणीय,अकल्पनीय सोहळा घडवून आणणारे सूत्रधार श्री प्रकाश गुडेल्लीवार (माझा साळा) ह्यांना शतश: धन्यवाद देतो. त्यांच्या अथक परिश्रमातून व कल्पनेतून त्यांचे स्वप्न पूर्ण करताना हा एक वात्सल्यपूर्ण सोहळा थाटात संपन्न झाला.श्री प्रकाश गुडेल्लीवार हा भव्यदिव्य कार्यक्रम तू घडवून आणलास.मी आणि माझा परिवार मनस्वी आभारी आहे

सुरेश मोतकुरवार अहेरी/गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *