[प्रवीण बाबरे ]
पालघर : डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायत सरपंच कल्पेश धोडी यांच्या अध्यक्षतेखाली व डहाणू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अहिरे चिंचणी ग्रामपंचायतिचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी रवींद्र थोरात यांच्या देखरेखीखाली उपसरपंच पदाची निवडनुक संपन्न झाली.
उपसरपंच यांनी स्वइच्छेने पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. त्यामुळे हे पद रिक्त झाल्याने ही निवडणूक घेण्यात आली या निवडणूक प्रक्रियेत करण बारी वॉर्ड १ (अ) , मंजुषा चुरी ४ (ड) व कासीम मुछाले वार्ड ६ (ई) असे मिळून एकूण तीन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले व त्यातील कासीम मुछाले यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले,, त्या मुळे या निवडणूक प्रक्रियेत दोन नामनिर्देशन पत्र कायम राहिल्याने उपसरपंच पदा साठी दुहेरी लढत पाहायला मिळाली दुपारी एक ते सांध्याकाळी चार वाजे पर्यंतच्या सुमारास ही निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने संपन्न झाली,
निवडणूकित मंजुषा चुरी यांना एकूण अकरा मते मिळाली तर करण बारी यांना एकूण सहा मते मिळाली अंतिम निकालात मंजुषा चुरी यांनी करण बारी यांचा पाच मताने पराभव करत एकूण अकरा मते मिळवत उपसरपंच हे पद पटकावले या निवडणूक प्रक्रियेत मंजुषा चुरी यांना बहुजन विकास आघाडी मोहसीन शेख व दीपा चाफेकर असे दोन व अपक्ष उमेदवार प्रशांत आकरे यांनी देखील मत मिळाळे तसेच काँगेस आणि राष्ट्रवादी चे कासिम मुछाले , कलावती पाटील , नितेश दुबळा , प्रिया बरफ व स्वतः असे एकूण पाच इतर तीन मतं ही गुप्त मतदान पध्दतीने मिळवत उपसरपंच पदि विजय मिळवला..